आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा:बीड तालुक्यात पिस्तुलाचा धाक दाखवत 10 लाखांचा ऐवज लंपास

बीड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ ते दहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दांपत्याला मारहाण करून ९ लाखांची रक्कम व १ लाख ६० हजारांचे दागिने लांबवले. ही घटना वडवाडी (ता. बीड) येथे गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली.

वडवाडीत प्रगतिशील शेतकरी अभिमान शाहूराव अवचर यांचे शेतात घर आहे. येथेच बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे कार्यालय असून या ठिकाणी विविध कृषी कंपन्या आहेत. अवचर हे पत्नी सत्त्वशीला यांच्यासह येथील बंगल्यात वास्तव्यास आहेत. गुरुवारी पहाटे त्यांच्या संस्थेत आलेल्या ८ ते १० चोरांनी कर्मचारी व व्यवस्थापकाच्या खोलीला बाहेरून कड्या लावून बंगल्यात प्रवेश केला. अवचर यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत अवचर दांपत्याला मारहाण करून पिस्तूल दाखवले. पिस्तुलाच्या धाकावर अंगावरील सोने काढून घेत पैसे कोठे ठेवले म्हणून जिवे मारण्याची धमकी देत तुझ्या वडिलांना व तुला जिवे मारण्याची सुपारी घेतल्याचे सांगत अभिमान अवचर व त्यांच्या पत्नीला बांधून ठेवले होते.

नोकरांचेही दरवाजे बंद
चोरट्यांनी पहाटे अडीच वाजेपर्यंत धुडगूस घातला. आरडाओरड करत एका नोकराने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा बाहेरून बंद होता. त्यानंतर खिडकीतून बाहेर येऊन दुसऱ्या नोकराचा बाहेरून बंद असलेला दरवाजा उघडून त्याला उठवले. नोकरांनी व्यवस्थापकाच्या रूमचा बाहेरून बंद असलेला दरवाजा उघडून त्यांना घेऊन तिघे बंगल्यात आले असता अवचरांच्या पायातून रक्त येत होते.

बातम्या आणखी आहेत...