आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनस्ताप’:निवडीनंतर 10 जण रुजूही झाले; स्थगितीने उमेदवारांना मनस्ताप

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेलीमानस या मानसिक आरोग्यासाठीच्या उपक्रमांतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरण्यात येणाऱ्या ३६ कंत्राटी पदांसाठी अर्ज, मुलाखत, निवड प्रक्रिया पार पडून दहा उमेदवार रुजू ही झाले होते मात्र, अचानक वरिष्ठ स्तरावरुन या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे.

कोविड काळानंतर राज्यात मानसिक आजारांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे मानसिक आजारांवर दूरध्वनीद्वारे समुपदेशन करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने टेलीमानस हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील चार रुग्णालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवला जाणार होता. यासाठी नागपूर एम्स रुग्णालय, ठाणे व पुणे येथील मानसिक रुग्णालय आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य रुग्णालयाचा समावेश करण्यात आला होता. सहायक प्राध्यापक, वरिष्ठ समपुदेशक, वैद्यकीय समुपदेशक, परिचारिका, प्रकल्प समन्वयक, संगणक परिचालक, समुपदेशक, अटेंडन्स अशा प्रकारची ३६ पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाने मंजूरी दिली होती. यासाठी २८ सप्टेंबर रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन उमेदवारांचे अर्जही मागवले गेले होते.

दीड हजारांवर होते अर्ज
दरम्यान, बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरण्यात येणाऱ्या विविध पदांच्या ३६ जागांसाठी सुमारे दीड हजार अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात सी एस डॉ. सुरेश साबळे व पॅनलने या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या हाेत्या.

पुढील आदेशापर्यंत स्टे
अतिरिक्त संचालकांच्या सूचनेनंतर या प्रक्रियेला स्थगिती दिली गेली आहे. निधी बाबत काही अडचणी असल्याची माहिती आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जागा भरल्या जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. रुजू झालेल्यांची ही सेवा थांबवली आहे.- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

१० जण कर्तव्यावर रुजू, मग स्थगिती
पदांच्या मुलाखतीनंतर निवड यादीही जाहीर केली होती. निवड झालेल्या ३६ पैकी १० उमेदवार प्रत्यक्ष कामावर रुजू ही झाले आहेत. यानंतर अतिरिक्त आरोग्य संचालकांनी भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे काय हा प्रश्न आहे.'

बातम्या आणखी आहेत...