आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्था:जिल्हा कारागृहाच्या कैद्यांना दिली जाणार 100 पुस्तके ; वैचारिक पुस्तकांचा समावेश

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ बीड आणि देवडी येथील माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वाचण्यासाठी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या स्मरणार्थ १०० पुस्तके भेट देण्यात येणार आहे. रोटरी क्लबच्या वतीने कैद्यांसाठी पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी कल्याण कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

२२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा कारागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.या कार्यक्रमास बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते कारागृहाला ही पुस्तक भेट देण्यात येणार आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थीत राहणार असुन जिल्हा कारागृहात हा कार्यक्रम होत असल्याचा माहिती देवडी येथील माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान देवडीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी दिली आहे.

वैचारिक पुस्तकांचा समावेश
देवडी येथील सरपंच तथा स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी सामाजिक धार्मिक, वैचारिक असे अनेक ग्रंथ जमा केले होते. माझ्या पश्चात ही पुस्तकं जनतेला उपलब्ध करून द्यावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या ग्रंथ संपदेतील १०० पुस्तके कारागृहातील कैद्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात धार्मिक, सामाजिक, वैचारिक पुस्तकांबरोबरच चरित्रग्रंथांचा समावेश आहे.
- एस. एम. देशमुख, अध्यक्ष, माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान, देवडी

बातम्या आणखी आहेत...