आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:जगदंबा मंडळाच्या शिबिरात 100 दात्यांनी केले रक्तदान

गेवराई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वात जुना आणि मानाच्या असलेल्या जगदंबा गणेश मंडळाचे यंदाचे ५३ वे वर्षे असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात शंभराहून अधिक दात्यांनी रक्तदान केले.

शिबिराच्या उद‌्घाटनप्रसंगी तहसीलदार सचिन खाडे, एपीआय संदिप काळे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश अट्टल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश अट्टल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मंडळाच्या पाच दशकांच्या परंपरेची माहिती देण्यात आली. तहसीलदार खाडे यांनी गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची परंपरा अतिशय कौतुकास्पद असून रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे, असेही सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी अन्नादान करण्यात आले असून यासह भजन कार्यक्रमही पार पडला. शहरातील सर्वात जुना आणि मानाचा गणपती मानला जात असल्याने जगदंबा मंडळाच्या ठिकाणी आरतीसह इतर धार्मिक कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...