आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धारूर येथे 1019 पशूंची तपासणी; जय किसान गणेश मंडळाच्या शिबिरास प्रतिसाद

धारूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.६ सप्टेंबर) पशुधन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात लहान मोठ्या १ हजार १९ प्राण्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी दोन बैलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिरास पशुपालकांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील कसबा भागातील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने लोक उपयोगी व समाज हिताच्या साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मंगळवारी सकाळी १० वाजता पशुधन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते. या पशुधन आरोग्य शिबिरात येथील परिसरातील शेतकऱ्यांनी आपले पाळीव प्राणी आणून सहभाग नोंदवला. या शिबिरात म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे आदी पशुंच्या तपासण्या करण्यात आल्या.

आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी पीपीआर लस, खुरकूत लसीकरण, वंध्यत्व तपासणी, फऱ्या रोग लसीकरण करण्यात आले. यासह दोन बैलांची वातीची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून सचिन डावकर, विजय शिनगारे, अॅड.परमेश्वर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पशु वैद्यकीय कार्यालयाच्या वतीने डॉ.गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय मसणे, कर्मचारी मामा नखाते, रमेश पारवे, जयराम वायकर इतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर मंडळाच्या वतीने सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. शेतकऱ्यांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल जय किसान मंडळाचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...