आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:तंत्रनिकेतनच्या 11 जणांची झाली निवड

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक,बीड येथील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील बोराडे विकास, हिमांशू काथार,प्रसाद कुलकर्णी, मारुती काळे, हाटोटे कृष्णा, फैजान शेख, वैभव चिंचकर, लखन गायकवाड, रोहित तांदळे, ऋषिकेश साळुंके, किशोर देवकते असे निवड झालेले विद्यार्थी आहेत.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष १८ हजार रुपये प्रति महिना, द्वीतीय वर्ष २२ हजार रुपये प्रति महिना व तृतीय वर्ष २५ हजार रुपये प्रति महिना असा पगार मिळणार आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्नि चे प्राचार्य नितीन गायकवाड यांनी दिली. या विद्यार्थ्यांची अभियोग्यता चाचणी, व्यक्तिमत्व चाचणी, वैयक्तिक मुलाखत अशा विविध स्वरूपात चाचण्या घेण्यात आले असून हे सर्व विद्यार्थी सर्व टप्प्यावर यशस्वी झाल्याने त्यांची निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, सचिव आ. सतीश चव्हाण, टी.पी.ओ. प्रमुख बी. आर. धुमाळ, कॉम्प्युटर शाखेचे जे. व्ही. देशमुख, मेकॅनिकल शाखेचे एफ. जे. शेख, इलेक्ट्रिकल शाखेचे एस. टी. शिनगारे व इतरांनी स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...