आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या एकशे दहा विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन अनुभवला. स्वतः विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक आणि सेवकांची पदे भूषविली. मुख्याध्यापक म्हणून प्रणव रामदासी, उपमुख्याध्यापक विवेक चाटे, पर्यवेक्षक कन्हैया, खंदाडे अमेय बर्दापूरकर या विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठीचे प्रशासन चालवले. त्याचप्रमाणे ११० विद्यार्थ्यांनी विविध विषयांच्या तासिका आठवी आणि नववी वर्गावर जाऊन घेतल्या.
सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी व काही विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचा एक दिवसाचा अनुभव व्यक्त केला. आयोजित स्वयंशासन दिन कार्यक्रमास मुख्याध्यापक अपर्णा पाठक, उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती, पर्यवेक्षक विवेकानंद कुलकर्णी उपस्थित होते. शाळेतील सहशिक्षक अमृत महाजन, ज्ञानेश पाटील, तिलोत्तमा इंगोले व एस. डी. गोस्वामी यांनी यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.