आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय मॅरेथॉन:गुलाबी थंडीत धावले 1200 धावपटू ; राज्यभरातील धावपटूंचा स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तिरुमला बाला घाट हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला बीडसह राज्यभरातील धावपटूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळी ६ वाजता गुलाबी थंडीत १२०० धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावले. जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, सीईओ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन धावले. योगा प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. शहरापासून जवळच असलेल्या पालवण परिसरातील बाला घाटाचा पायथा ते माथा अशी तिरूमला बाला घाट हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा रविवारी हजारो धावपटूंच्या प्रचंड उत्साहात यशस्वीपणे पार पडली. गुलाबी थंडीत बीडसह राज्यभरातून आलेले हजारो धावपटू मॅरेथॉनमध्ये धावले. या स्पर्धेत पाच किलोमिटर, दहा किलोमिटर, एकवीस किलोमीटर असे तिन टास्क ठेवण्यात आले होते. यात पाच किलोमीटर मॅरेथॉनमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडीत, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी विक्रम सारुक धावले अन् त्यांनी स्पर्धा पुर्ण केली.

बातम्या आणखी आहेत...