आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर:भाजपच्या 13 नगरसेवकांना महाराष्ट्र दिनाचा विसर; प्रभारी मुख्याधिकारी गैरहजर, आष्टीतील प्रकार

आष्टी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी काम नसले तरी नगरपंचायतमध्ये येऊन ए.सीची गार हवा खाऊन दिवसभर नगरपंचायतमध्येच बसणाऱ्या सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांना महाराष्ट्र दिनाचा विसर पडल्याचे चित्र नगरपंचायत कार्यक्रमाला दिसत होते. लोकांमधून सतरा व स्वीकृत दोन असे एकूण १९ नगरसेवकांपैकी १४ नगर सेवक गैरहजर राहिले. यात १३ नगरसेवक भाजपचेच आहेत.

आष्टी नगरपंचायतमध्ये दुसऱ्या वेळेस बहुमताच्या जोरावर सत्तेवर बसलेल्या भाजपला बहुदा महाराष्ट्र दिनाचा विसर पडला. १ मे रोजी नगरपंचायतमध्ये ध्वजारोहणासाठी काही मोजके म्हणजे अध्यक्ष पल्लवी धोंडे, नगरसेवक विमल सुरवसे, पंखाबाई रेडेकर, नाजिम शेख, सुरेखा वाल्हेकर हे सहाच नगरसेवक उपस्थित होते. इती कार्यक्रमाला तासन्तास हजेरी लावणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह लोकप्रतिनिधी आणि खुद्द नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनाही महाराष्ट्र दिनाचा विसर पडल्याने शहरातून राजकीय मंडळींवर टीका केली जात आहे.

उपनगराध्यक्ष दवाखान्यात: उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे यांना विचारले असता, ते आजारी असल्याने अहमदनगर येथील दवाखान्यात गेले होते. आजारी असल्याने ते घरीच आराम करत असल्याचे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे यांनी बोलताना सांगितले.

मुख्याधिकारी वर्षापासून प्रभारीच : वर्षभरापासून आष्टी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार हा प्रभारीवरच आहे. परंतु नगरपंचायतचे मुख्याधिकारी बाळदत्त मोरेही गैरहजर होते.

या नगरसेवकांनी मारली दांडी : प्रभाग.२ शैलेश सहस्रबुद्धे (भाजप), प्रभाग क्रं.३ भारत मुरकुटे, प्रभाग क्र.४ नूरजहांबी नवाबखान पठाण (भाजप), प्रभाग क्र.६ शेख शारमीन ताजोद्दीन (भाजप), प्रभाग क्र.७ फतेमाबी हारूण शेख (अपक्ष), प्रभाग क्र-८ ज्ञानदेव रघुनाथ (अपक्ष), प्रभाग क्र.९ शेख शमीम रशीद(सभापती), धोंडे अक्षय सुरेश (भाजप), प्रभाग क्र.१२ बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला (भाजप), प्रभाग क्र.१३ वारंगुळे सुरेश अादिनाथ (भाजपा), प्रभाग क्र.१४ झरेकर किशोर हिराचंद (भाजप), शिकरे महादेव दिलीप (राष्ट्रवादी काँग्रेस) व स्वीकृत नगरसेवक अनिता गर्जे, अस्लम शेख हे दोन्ही भाजपचे स्वीकृत नगरसेवक, अशा १४ नगरसेवकांनी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला दांडी मारली आहे.

मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात
ध्वज वंदनासाठी आष्टी नगरपंचायतमधील सत्ताधारी भाजपच्या उपनगराध्यक्ष, सभापती, काँग्रेसचे नगरसेवक सर्वच लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी गैरहजर राहिले. गैरहजर नगरसेवकांनी आष्टीकरांची जाहीर माफी मागावी, नसता आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...