आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:बीड जिल्ह्यात दसरा मुहूर्तावर 1 हजार 345 दुचाकींची विक्री;उत्पादन कमी,400 हून अधिक दुचाकींसाठी ग्राहक वेटिंगवर

रवी उबाळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना संकटानंतर बाजरपेठामधील सर्वच क्षेत्रामध्ये माेठ्या प्रमाणावर उत्पादक कंपन्यांकडे वस्तू निर्मितीचे आव्हान निर्माण झाले हाेते. याचा थेट परिणाम दसरा आणि दिवाळीमध्ये बाजारात स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. वाहनांची मागणी आहे परंतु कंपन्यांकडून ग्राहकांच्या पसंतीच्या वाहनांचे उत्पादन कमी असल्याने वेटिंगची वेळ येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये सहा विविध दुचाकी कंपन्याचे ३९ शाेरूम असून चारचाकी वाहनांच्या पाच कंपन्यांचे जिल्हास्तरावर शाेरूम आहेत.

बीड जिल्ह्यात दसरा मुहुर्तावर १ हजार ३४५ दुचाकींची बुकींग असून १२ काेटी ५० लाखांची उलाढाल एकाच दिवशी हाेणार आहे. उत्पादन कमी असल्याने ४०० हून अधिक दुचाकीसाठी ग्राहक वेटींगवर असल्याने त्यांना दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पदन्नाचे तालुके म्हणून माजलगाव, अंबाजाेगाई, परळी, गेवराई या तीन तालुक्यांची आघाडी आहे. त्यापाठाेपाठ वडवणी, धारूर, बीड केज नंतर आष्टी, पाटाेदा, शिरुर या तालुक्यांचा क्रमांक आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यामध्ये विविध सहा दुचाकी वाहन कंपन्यांचे एकूण ३९ शाेरूम आहेत.

दसरा आणि दिवाळीच्या मुहुूर्तासाठी वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रेलचेल जुलै- आॅगस्टपासूनच सुरू झाली हाेती. त्यानुसार बीड जिल्ह्यातील विविध शाेअरुमचे संचालक-मालकांकडून कंपन्यांकडे अधिकच्या दुचाकी बुकींगचा प्रयत्न केलेला आहे. मात्र उपलब्ध वाहनांमध्ये पसंतीच्या वाहनांची मागणी अधिक असल्याने बीड जिल्ह्यातील ग्राहक वेटिंगवर आहेत.

चारचाकी वाहनांमध्ये एसयूव्हीला १० महिन्यांची वेटिंग : काेराेनाच्या संकटामुळे कंपन्यांमध्ये मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला हाेता. त्यातच केंद्र सरकारकडून डिझेल वाहनांच्या विक्रीवर निर्बंध घातल्याने पेट्राेल चारचाकी वाहनची मागणी ग्राहकांमध्ये वाढली.

त्या तुलनेमध्ये चारचाकी वाहन कंपन्यांकडे पेट्राेल वाहनांचे उत्पादन कमी असल्याने बीड जिल्ह्यात सरासरी एक एसयूव्ही चारचाकी वाहनास १० महिन्यांची वेटींग आहे. यासर्व कंपन्यांच्या वाहनांची जिल्ह्यासाठी सरासरी मागील चार-पाच महिन्यांपासून १५० पेक्षा अधिक वाहनांची वेटींग आहे, अशी माहिती ह्युंदाई शाेरूमचे संचालक शुभम चितलांगे यांनी दिली.

हॅचबॅक चारचाकी वाहन १५ दिवसांत उपलब्ध
बीड जिल्ह्यात पाच कंपन्यांकडून निर्माण हाेणाऱ्या एसयूव्ही, सीएनजी, हॅचबॅक या प्रकारच्या चारचाकी वाहनांची ग्राहकांकडून मागणी आहे. सर्वच कंपन्यांची एसयूव्ही वाहने वेटिंगवर आहेत तर सीएनजी आणि हॅचबॅक प्रकारची चारचाकी वाहने १० ते १५ दिवसांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहेत.

३०० वाहनांची प्रतीक्षा
बीड शहरामधून युनिकाॅन व शाईन या दाेन माॅडेलच्या ३०० वाहनांची प्रतीक्षा आहे. दिवाळीपर्यंत उपलब्ध हाेतील. दसरा निमित्त एकाच दिवशी ज५०० वाहनांची विक्री हाेणार आहे. -सुरेंद्र कासट, संचालक, हाेंडा शाेरूम, बीड.

१०० वाहनांना वेटिंग
स्कूटर सेगमेंटमध्ये दाेन वाहनांना पसंती असून दसऱ्यानिमित्त एकाच दिवशी १७० वाहनांची विक्री हाेणार असून १०० वाहनांना प्रतीक्षा आहे. एका दिवसात सरासरी दीड काेटीची उलाढाल हाेईल.- सुनील कलंत्री, व्यवस्थापक, सुझुकी शाेरूम, बीड.

दीड काेटीची उलाढाल
कंपनीच्या सर्वाधिक दाेन दुचाकींना मागणी आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधून २०० वाहनांची विक्री दसऱ्यानिमित्त हाेणार आहे. यातून सरासरी दीड काेटीची उलाढाल हाेणार आहे.- सचिन कांकरिया, संचालक, बजाज शाेरूम, बीड.

दुचाकी वाहनांची मागणीनुसार उपलब्धता
जिल्ह्यात हीराे कंपनीचे दहा तालुक्यात शाेरूम आहेत. हिराेच्या विविध माॅडेलच्या वाहनांना अधिक मागणी आहे. वाहनेही उपलब्ध आहेत. दसरा निमित्त एकाच दिवशी २५० वाहनांची विक्री हाेणार आहे. यातून अडीच काेटींची उलाढाल हाेईल.- प्रदीप चितलांगे, संचालक, हीराे शाेरूम, बीड.

बातम्या आणखी आहेत...