आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गेली २५ वर्ष व त्याहून अधिक विना अपघात सुरक्षित सेवा देणाऱ्या १५ एस टी चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बीड विभागातील २५ वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीत एकही अपघात नसणाऱ्या चालकांना गौरविण्यात येते. विविध आगारातील व सेवा निवृत्त झालेल्या चालकांचा देखील गौरव करण्यात आला.
विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे, यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा रक्कम रुपये पंचवीस हजार चा धनादेश व साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी यंत्र अभियंता अशोक पन्हाळकर , विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, उप यंत्र अभियंता रविराज घोगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक शिवराज कराड, विभागीय लेखाधिकारी नारायण मुंडे, विभागीय सांख्यिकी अधिकारी कोलगे, कामगार अधिकारी राठोड, सुरक्षा व दक्षता अधिकारी यादव आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात अाला. त्यात सोनाप्पा रामभाऊ पवार, शामराव किसनराव मस्के , मनोहर हरिभाऊ मुंडे, नरहरी राघोजी लिंगायत, उत्तम चांगदेव जाधवर, भाग्यवंत सिद्धेश्वर गोरे , योगराज लालू जाधव, उत्तम बन्सी गायकवाड, महादेव सोनराव खेडकर, प्रकाश नामदेव वाघमारे, दिलीप विठ्ठलराव मस्के, मधुकर शिवाजी शिराळे, बालाजी विठ्ठल गंगणे, वसंत रामभाऊ केंद्रे, दिलीप महादेव हाेनराव यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.