आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी पसार:फायनान्स कंपनीचे दीड लाख घेऊन कर्मचारी पसार

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी फायनान्स कंपनीचा फील्ड ऑफिसर म्हणून काम करताना वसूल केलेले दीड लाख रुपये घेऊन कर्मचाऱ्यानेच पोबारा केल्याची घटना बीडमध्ये घडली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विठ्ठल बाळासाहेब काकडे (३३, रा. पालोदी ता. मानवत, जि. परभणी) असे पोबारा केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो भारत फायनान्स कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून काम करत होता. कर्जधारकांकडून पैशांची वसुली करुन कंपनीला भरण्याचे काम तो करत हाेता. ७ ते १४ ऑक्टोबर दरम्यान त्याने १ लाख ५५ हजार ९५४ रुपयांची वसुली केली मात्र कंपनीला हे पैसे न भरताच त्याने पोबारा केला. कंपनी व्यवस्थापनाने यानंतर विठ्ठल बाळासाहेब काकडे याच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याशी कोणताही संपर्कही होऊ शकला नाही.

वा त्यानेही कंपनीशी कोणताही संपर्क केला नाही. त्यामुळे या प्रकरणी या खासगी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी फिरोज रशीद शेख यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठल बाळासाहेब काकडे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस पसार झालेल्या त्या कर्मचार्याचा कसून शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...