आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड शहरासाठी अमृत योजनेतून शासनाच्या १५० कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध केला आहे. यातील कामे विहित वेळेत पूर्ण होणे गरजेचे असून असणाऱ्या अडचणी तातडीने दूर केल्या जाव्यात यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजिप्रा) व नगर परिषद बीड यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिले.
अमृत योजनेअंतर्गत बीड शहरासाठी पाणी पुरवठा योजनेबाबत राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) रोजगार हमी, भुकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड नियोजन समिती सभागृहात बैठक झाली. बैठकीला आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, माजी आमदार सलीम सय्यद, सुनील धांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत उपस्थित होते राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, सदर योजनेचे कंत्राटदार काम संथगतीने करीत असल्याचे दिसून आले असून विहित वेळेत काम पूर्ण न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मातोश्री पांदन रस्त्याचे काम कौतुकास्पद आहे. वेगात व त्रिस्तरीय पद्धतीचा वापर करून हे काम होत असून यामध्ये आमदार, सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांना देखील मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले जावे. सदर कामाच्या पॅटर्न राज्यभरात लागू करण्याबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत सूचना देण्यात येतील असे राज्य मंत्री महोदयांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कार्यकारी अभियंता पी.जी. जोगदंड, कार्यकारी अभियंता तुषार टेकवडे, बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे, उप अभियंता मधुकर वाघ उपस्थित होत. यावेळी कार्यकारी अभियंता जोगदंड यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा सादर केला. आमदार क्षीरसागर यांनी बीड शहरासाठी जल प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून देखील सदर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना पाणी देण्यात अडचणी आहेत.
आपण मजिप्रा अधिकारी सोबत यापूर्वी कामास भेट देऊन पाहणी केली आहे. यासाठी आमदार निधीतून देखील निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांनी वेळेत काम न केल्यास त्यांना काळ्या यादीत समावेशित करण्याची कार्यवाही मुख्याधिकारी यांनी करावी अशा सूचना यावेळी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात मातोश्री पांदण रस्ता योजनेतून अतिशय चांगले काम होत असल्याचे नमूद केले याद्वारे जिल्ह्यात ८१२ किलोमीटरचे रस्ते पांदण रस्ते तयार केले जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी ‘रविंद्र इंगोले यांच्या माझ्या गावची समृध्दी माझी जबाबदारी’ या पुस्तिकेचे मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.