आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:आईने काम सांगितल्याने रागात मुलीची आत्महत्या, बीडच्या केज तालुक्यात 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईने काम सांगितल्याचा राग आल्याने १६ वर्षीय मुलीने राहत्या घरी स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे ३ मे रोजी दुपारच्या वेळी घडली.

तालुक्यातील जिवाचीवाडी येथील प्रणिता नीलकंठ चौरे (१६) या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली होती. आईने तिला घरातील काम सांगितले होते. याचा राग आल्याने प्रणिता चौरे हिने ३ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरी स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच विडा बीटचे जमादार उमेश आघाव, पोलिस नाईक बाळू सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. केज पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जमादार आघाव व पोलिस नाईक सोनवणे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...