आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्रता परीक्षांच्या तारखांत फेरबदल:१७ सीईटींच्या तारखेत फेरबदल

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या वेळापत्रकात सीईटी सेलने बदल केले आहेत. केंद्राच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने देशपातळीवर जाहीर जेईई (मेन) आणि ‘नीट’ परीक्षांचे वेळापत्रक व राज्याच्या सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकात साम्य आढळले होते. त्यामुळे राज्याच्या सीईटी सेलने शैक्षणिक सत्र २०२२-२३ दरम्यान प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या १७ पात्रता परीक्षांच्या तारखांत फेरबदल केले आहेत. ५ ते २२ ऑगस्टदरम्यान सीईटी होईल.

वैद्यकीय शिक्षण : भौतिकोपचार, व्यावसायोपचार, स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी, प्रोस्थोस्टिक्स अँड ऑर्थोटिक्स आदी अभ्याक्रमांच्या सीईटी परीक्षा ११ सप्टेंबरला घेण्यात येणार आहेत.

तंत्रशिक्षण व कृषी शिक्षण : अभियांत्रिकी प्रथम वर्ष (पीसीएम ग्रुप) ५ ते ११ ऑगस्ट, औषधनिर्माणशास्त्राचे प्रथम वर्ष (पीसीबी) १२ ते २० ऑगस्ट, प्रथम वर्ष कृषी शिक्षण (१५, १६ आणि १७ ऑगस्ट वगळून) एमबीए, एमएमएस या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची पुर्वपरीक्षा २३, २४, २५ ऑगस्टदरम्यान होईल. एमसीए-४ आणि ५ ऑगस्ट, बी.एचएमसीटी-२१ ऑगस्ट, बॅचलर ऑफ प्लॅनिंग ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...