आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकरत्न:केजमध्ये 17 शिक्षक होणार शिक्षकरत्नने सन्मानित

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने १७ शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार, तीन शिक्षकांना विशेष पुरस्कार तर १० सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर यंदा वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या व नव्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या १२ गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष सज्जन जाधव होते तर पाहुणे म्हणून बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, नगराध्यक्षा सिता बनसोड, संतोष हंगे, दत्ता धस, गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, दत्ता चाटे, भाऊसाहेब गुंड, प्रा. हनुमंत भोसले, पत्रकार गौतम बचुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिक्षक रत्न पुरस्काराने बाबासाहेब कांबळे, आश्रुबा गायकवाड, बालासाहेब ढेंगळे, तानाजी जाधव, अर्चना चंदनशिवे, अश्विनी जगदाळे, मंजुषा वानखेडे, दीपाली पवार, अनिता गायकवाड, रेखा धेंडे, अनंत जाधवर, प्रकाश घोरपडे, बालासाहेब आंबाड, रमेश वरवडे, आशा चव्हाण, लक्ष्मण जगदाळे, चंद्रकांत पाळवदे, प्रक्षिती जाधव, दिलीप अंबाड यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच डॉ. रामकिशन मुळे, तुकाराम देशमुख, भारत काळकुटे यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणारे सेवानिवृत्त शिक्षक शुक्राचार्य गव्हाणे, मारुती घाडगे, अब्दुल समद शेख, शाम कल्याणकर, अन्सारी मोहम्मद, मल्हारी बारगजे, विष्णू बचुटे, राजेंद्र बारबोले, रईसोदीन शेख यांचा ही सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी याप्रसंगी बोलताना शिक्षकांचे कार्य हे समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देणारे असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातूनही वैद्यकीय अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यशस्वी होत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या विद्यार्थ्यांच्या हातून समाजाची अधिकाधिक सेवा घडावी व तालुक्याचे नाव उज्ज्वल व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. रामकिशन मूळे आणि लोंढे यांनी तर आभार संजय चौरे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यासोबतच यावर्षी मेडिकलला लागलेल्या श्रीकृष्ण चाटे, मयुरी सारुक, वैष्णवी डोईफोडे, प्रतिक्षा काळे, स्वप्निल चवरे, श्वेताली देशपांडे, व्यंकटेश जोगदंड, शितल कद, संकेत तपसे, प्राजक्ता देशमुख, सौरभ मस्के, श्रुती रोडे, सुमित केंद्रे, पुनम डोईफोडे यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी, अशी अपेक्षा याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...