आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:18 लाखांना फसवले; दांपत्याविरुद्ध गुन्हा

बीड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अधिक परताव्याचे आमिष दाखवून ३३ लाख रुपयांची गुंतवणूक करायला लावून त्यातील १८ लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार अंबाजोगाई शहरात समोर आला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दांपत्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सुहास दैवानराव मस्के (३३, रा. भीमनगर, केज) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते कर्ज सल्लागार म्हणून काम करतात. त्यांची ओळख गणेश राजाराम भिसे यांच्याशी झाली होती. या ओळखीतून गणेश भिसे व त्याची पत्नी पूजा भिसे यांनी सुहास मस्के यांना त्यांनी काढलेल्या स्वराज जी. बी. इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते.

बातम्या आणखी आहेत...