आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेश:आरटीईअंतर्गत 1830 विद्यार्थी प्रवेशास पात्र; लॉटरी पद्धतीने झाली निवड; 30 मार्च रोजी पुण्यात पार पडली सोडत

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते. या प्रक्रियेसाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने बुधवारी (३० मार्च) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशासाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या आरक्षणाची सोडत काढली. जिल्ह्यात २२७ पात्र शाळांमध्ये ४ हजार ९५२ इतके ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ८३० विद्यार्थ्यांची निवड मोफत प्रवेशासाठी झाली आहे.

ही सोडत शाळानिहाय काढण्यात आली. या प्रवेशासाठीच्या सोडतीचे यंदा पहिल्यांदाच साेशल मीडियावरून लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. या सोडतीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शाळानिहाय याद्या सोमवारी (४ एप्रिल) आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

तसेच आरटीईअंतर्गत आपल्या पाल्याला मोफत प्रवेश मिळावा यासाठी पालकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करत बोगस कागदपत्रांआधारे मोठ्या प्रमाणात शाळांच्या जवळील रहिवासी असल्याचे अर्जात नमूद केले आहे. आशा पालकांच्या रहिवासी पुराव्याच्या कागदपत्रांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे बोगस प्रवेशांना आळा घालण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाला रीतसर पत्र दिले आहे. परंतु, त्यावर कोणतीही पावले उचलली नाहीत. यात बोगस प्रवेश झाल्यास शिक्षण संचालकांकडे तक्रार करणार असल्याचे मनोज जाधव यांनी म्हटले आहे.

मेसेज पाठवण्यात येणार
प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांनी अर्ज भरताना प्रवेश अर्जावर नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवण्यात येणार आहेत. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता खात्री करून घ्यावी, अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...