आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण:केजच्या वीज कार्यालयासमोर 2 कुटुंबांचे उपोषण

केजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

घराशेजारची विद्युत तार आहे, ती तशीच ठेवावी, रोवलेला पोल काढावा या मागण्यासाठी केज शहरातील धारूर रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबांनी बुधवारी सकाळी येथील विद्युत महावितरण कंपनी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

शहरातील धारूर रस्त्यावर असलेल्या विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील भागात शिवाजी प्रभाकर शिंदे व गोरखनाथ थोरात यांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराच्या पाठीमागून ५ फूट अंतरावरून ११ के. व्ही. ची विद्युत वाहिनी गेलेली आहे. तर २०१३ मध्ये या तारेचा शॉक लागून शिवाजी शिंदे यांच्या पत्नी मनीषा थोरात यांना गंभीर इजा झाली होती. त्यानंतर २९ मे २०२२ रोजी विद्युत कार्यालयाने या तारेची उंची वाढवून बदल केला होता.

मात्र, पुन्हा ४ जून २०२२ रोजी या तारेमध्ये बदल केला. विद्युत कार्यालयाचे काही कर्मचारी मनमानी करून तारेत अधूनमधून बदल करत अर्वाच्च भाषेत बोलून धमकी देताहेत. नेहमी या तारेत बदल न करता घराशेजारी असलेली विद्युत तार आहे, ती तशीच ठेवावी, रोवलेला पोल काढावा, या मागण्यासाठी प्रभाकर शिंदे, मनीषा शिंदे, गोरखनाथ थोरात, मीरा थोरात यांनी बुधवारी सकाळी १० वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू केले.