आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:शेतरस्त्यावरून खडकीत 2 गट समोरासमोर; परस्पर विरोधी तक्रारींवरून 9 जणांवर गुन्हा

बीड7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शेत रस्त्याच्या कारणावरून खडकी (ता.गेवराई) येथे दोन गट समोरासमोर आले. यात परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांच्या ९ जणांवर गुन्हा नोंद केला. केशव शहादेव नागरगोजे (५०) यांच्या तक्रारीनुसार, उसाचा ट्रक शेतातून नेऊ नका असे म्हणल्यावरून सखाराम अर्जुन उघडे, विठ्ठल अर्जुन उघडे, पृथ्वीराज विठ्ठल उघडे, अर्जुन अप्पासाहेब उघडे यांनी गजाने, काठीने व पाइपने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंद केला. तर, याच प्रकरणात सखाराम उघडे (४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तुम्ही आमच्या विरोधात कोर्टात केस का केली? आता तुम्ही आमच्या शेतातून जायचे नाही असे म्हणून रंजित श्रीमंत सानप, श्रीमंत ज्ञानोबा सानप, दीपक केशव नागरगोजे, केशव शहादेव नागरगोजे, बाबासाहेब शहादेव नागरगोजे यांनी पाइप व तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. दोन्ही गटांच्या तक्रारींवरून ९ जणांवर चकलांबा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...