आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार पाल्यांना लाभ‎:संगणक शिक्षणासाठी आता कामगार‎ पाल्यांना 2 लाखाचे अर्थसहाय्य मंजूर‎

परळी‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र कामगार कल्याण‎ मंडळाच्या वतीने एमएससीआयटी‎ हा संगणक कोर्स करणाऱ्या कामगार‎ व कामगार पाल्यांना दरवर्षी आर्थिक‎ सहाय्य केले जाते. बीड, लातूर व‎ उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२‎ कामगार व कामगार पाल्यांनी हा‎ संगणक कोर्स उत्तीर्ण केल्यामुळे‎ त्यांना कामगार कल्याण मंडळातर्फे‎ अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले.‎ कामगार व त्यांच्या कुटुंबातील‎ सदस्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे,‎ एमएससीआयटी हा कोर्स पूर्ण‎ करून व्यवसाय करता यावा, तसेच‎ रोजगार उपलब्ध होण्यासाठी या‎ योजनेंतर्गत अर्थसहाय्य करून‎ प्रोत्साहन दिले जाते.

यंदाच्या वर्षात‎ बीड, लातूर व उस्मानाबाद‎ जिल्ह्यातील ९२ कामगार पाल्यांना २‎ लाख २ हजार ९५० रूपयांचे‎ अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.‎ मंजूर करण्यात आलेली रक्कम‎ लाभार्थींच्या वैयक्तिक बॅंक‎ खात्यावर जमा करण्यात येणार‎ आहे. कामगारांची मुले संगणक‎ शिक्षणात पुढे यावी. संगणक‎ शिक्षणातून आर्थिक सक्षम व्हावी‎ म्हणुन ही योजना राबविण्यात येते.‎ अधिकाधिक कामगारांच्या पाल्यांनी‎ या योजनेचा लाभ घ्यावा, असे‎ आवाहन कामगार कल्याण‎ अधिकारी भालचंद्र जगदाळे यांनी‎ केले.

कामगार व कामगार पाल्यांनी‎ एमएससीआयटी हा कोर्स ६० टक्के‎ गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यास व‎ संगणक शिक्षण घेण्यासाठी‎ भारलेल्या फीसच्या ५० टक्के‎ रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली‎ जाते. या योजनेचा अर्ज दरवर्षी जुलै‎ ते डिसेंबर दरम्यान ऑनलाईन‎ पध्दतीने भरणा करावा लागतो. या‎ योजनेचा लाभ कामगार कल्याण‎ मंडळाकडे नोंदणी केलेले कामगार‎ घेऊ शकतात, असे कामगार‎ कल्याण केंद्र संचालक आरेफ शेख‎ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...