आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही कृषी दुकानदार मागणी असलेल्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण करून चढ्या दराने विक्री करताहेत. त्यामुळे माजलगाव कृषी अधिकारी व जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांनी मंगळवारी माजलगावात ४ पथके तयार करून २० ते २५ कृषी दुकानदांराची चौकशी करून एका दुकानदारावर कारवाईसाठी नोटीस दिली. शहरातील मोंढ्यात काही कृषी दुकानदार सोयाबीनच्या बॅग आणि कपाशीच्या बॅगसाठी अधिकचे पैसे घेत आहेत. यावर कारवाईसाठी कृषी पथकाने डमी ग्राहकसह फिरून माजलगाव मोंढ्यातील विक्रेत्यांकडे बियाण्यांची व त्यांच्या दराची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी डमी ग्राहकाकडे बियाणे खरेदीसाठी पैसेही दिले होते.
मोंढ्यात डमी ग्राहकाला सुमित अग्रो सेंटरच्या मालक ढेरे यांनी सोयाबीन ग्रीनगोल्ड ३३४४ या वाणाला ४ हजार ३०० रुपये सांगितले, तर कबड्डी कापसाच्या बॅगला बाराशे रुपये सांगितले. ग्राहक व दुकानदार यांच्यात तडजोड होत सोयाबीनची बॅग ४३०० रुपये, तर कपाशीची बॅग ११५० रुपयांना देण्याचे ठरले. या वेळी डमी ग्राहकाने दुकानदाराला पैसे दिले. याच वेळी बाजूला दबा धरून बसलेले शेतकरी वेशात असलेले जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक एस. डी. गरंडे, जे. बी. भगत तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यांनी दुकानदाराला दिलेल्या पैसे हस्तगत करून संबंधित सुमित अग्रो सेंटरचा हा दुकानदार किमतीपेक्षा जास्त किमतीत सोयाबीनची बॅग व कपाशीची बॅग विकत असल्याचे निदर्शनास आले.
तालुका कृषी अधिकारी एस. एस. संगेकर, हजारे एस. जी. कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्यासमवेत पंचनामा करून संबंधित कृषी दुकानदारास त्याचे म्हणणे सांगण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली. नोटीस देऊनही जर दुकानदाराने दिलेल्या तारखेत योग्य माहिती दिली नाही, तर संबंधित दुकानदाराच्या परवान्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.