आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक‎:बीडमधील कंत्राटदाराची‎ 20 लाखांची फसवणूक‎

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोडाऊन दुरूस्तीच्या कामकाजासाठी‎ पत्रा पाठविण्यासाठी बीडमधील एका‎ कंत्राटदाराकडून ४० लाख रूपयांची रक्कम बँक‎ खात्यावर मागवून घेतली. नंतर मात्र त्यातील‎ केवळ २० लाख रूपयांचे पत्रे कंत्राटदाराला‎ पाठविले. उर्वरित २० लाख रूपये व जीएसटीचे‎ बिले कंत्राटदाराला न पाठवता फसवणूक केली.‎ या प्रकरणी मुंबईतील दाऊद शहाबुद्दीन सुतार‎ याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.‎

मोहन भोसले (रा.बार्शी रोड, बीड) असे‎ फसवणूक झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे.‎ त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे बीडमध्ये‎ कंट्रक्शन आहे. ३१ मार्च २०२२ ते २५ सप्टेंबर‎ २०२२ या कालावधीत फसवणूकीचा हा प्रकार‎ घडला. मोहन भोसले यांनी पत्रे खरेदी‎ करण्यासाठी मुंबईतील दाऊद शहाबुद्दीन सुतार‎ याच्याशी संपर्क केला. त्याने गोडाऊन‎ दुरूस्तीच्या कामकाजासाठी पत्रा सप्लाय करतो‎ असे सांगितले. तसेच मोहन भोसले यांच्याकडून‎ रोख लाख रूपये ऑनलाईन आरटीजीएसद्वारे‎ ३९ लाख त्याच्या बँक खात्यावर वर्ग केले होते.‎

बातम्या आणखी आहेत...