आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमांस:आष्टीत 200 किलो गोमांस पकडले

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीररीत्या गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवणाऱ्या दोघांविरूध्द आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ९ डिसेंबर रोजी शहरातील तलवार नदीच्या किनार्‍यालगत कुरेशी गल्ली येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

शाकेर कुरेशी व अरबाज शाकेर कुरेशी (रा.कुरेशी गल्ली, आष्टी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत उपनिरीक्षक काळे यांनी फिर्याद नोंदवली. ९ डिसेंबर रोजी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपींनी गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून २०० किलो मांस चोरटी विक्री करण्यासाठी ठेवले असल्याचे पोलिसांना दिसून आले होते. त्यानंतर दोघांविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...