आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होऊन या परिक्षेसाठी विविध विषयांचे ज्ञान अवगत करावे यासाठी विडा (ता. केज) येथे विश्व फाउंडेशन हे स्व.विश्वंभर ज्योतिबा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ मागील काही वर्षांपासून शिष्यवृती परीक्षा घेते. रविवारी घेतलेल्या या परीक्षेत या भागातील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत परीक्षा दिली.
आता निकालानंतर प्रत्येक वर्गातून पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. केज तालुक्यातील विडा येथे मागील काही वर्षापासून विश्व फाउंडेशन हे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची बीजे रुजावीत. त्यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षेची भीती मनातून काढून तयारी करीत यश संपादन करावे हा उद्देश समोर ठेवून स्व.विश्वंभर ज्योतिबा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृती परिक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही रविवारी दुपारी १२ वाजता गावातील राजा हनूमान मंदिर परिसरात या शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.
या परिक्षेत परिसरातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत २०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर सदरील परिक्षेत प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ३००१ रूपये, द्वितीय विद्यार्थ्यास १५०० एक रूपये तर तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांस १००१ रूपये रोख बक्षिस व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. विश्व फांडेशनने सुरू केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे व्यासपीठ निर्माण झाले आसून अतिशय चांगला उपक्रम राबवल्याचा आनंद होत असल्याचे मत याप्रसंगी माजी पं. स. सदस्य तथा शिक्षक विजयकुमार पटाईत यांनी व्यक्त केले. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल पवार, शिक्षक देशमुख, कुलकर्णी, कुरेशी, निर्मळ, प्रा. सचिन जाधव, डाॅ.धनराज पवार, चिंतामण काळे, श्याम भोसले, डॉ.उदय पवार यांनी परिश्रम घेतले. तर परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांची फाउंडेशनच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.