आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 उपकेंद्रांवर शनिवारी होणार परीक्षा:एमपीएससीच्या गट क पूर्व परीक्षेला 2 हजार उमेदवार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ५ नोव्हेंबर रोजी बीड जिल्हा केंद्रातील एकूण ८ उपकेंद्रामधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २ हजार ८०८ उमेदवार बसलेले आहेत. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

आयोगाच्या सूचनेनुसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाइल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रिक वस्तू व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतीही दोन ओळखपत्रे व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.

सकाळी साडेआठ वाजेपूर्वी उपस्थित राहा
उमेदवारांना त्यांच्या परीक्षा उपकेंद्रावर सकाळी ८.३० वाजेपूर्वी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...