आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिपत्रक:‘आधार’विना 2.12 लाख विद्यार्थी योजनांपासून वंचित? ; शिक्षण आयुक्त उद्या घेणार आढावा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व प्रकारच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी शाळांची आहे. यासाठी आधार कार्ड सक्तीचे करूनही जिल्ह्यातील शाळांना विद्यार्थ्यांप्रति गांभीर्य नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत २ लाख १२ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले नाही. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

शासनाने शाळांना ३१ ऑगस्टपर्यंत आधार अपडेट करण्याची मुदत दिली आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक संस्थांना यापूर्वीच आदेश दिले आहेत. विविध योजनांतर्गत विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांचे आधार व बँक खात्याची नोंद करणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने सरकारी, अनुदानित, कायम विनाअनुदानित, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांना सूचना केल्यानंतरही २ लाख १२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही. यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांनी ३१ ऑगस्टपर्यंत माहिती अपडेट न केल्यास विद्यार्थी लाभांपासून वंचित राहिल्यास शाळाच जबाबदार राहील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

शिक्षण आयुक्त उद्या घेणार आढावा

महाराष्ट्रातील पहिली ते बारावीपर्यंतच्या २५ लाख ३० हजार २१८ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ३१ ऑगस्टपूर्वी आधार अपडेट करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद व लातूर जिल्ह्यांची पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयात २२ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तसेच, औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख १२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही, अशी माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...