आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण‎:213 कोटींच्या रस्ते कामावरून रंगले‎ जिल्ह्यामध्ये श्रेयवादाचे राजकारण‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड विधानसभा मतदारसंघात‎ केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून‎ २१३ कोटींच्या चार रस्त्यांच्या‎ कामांना मंजूरी मिळाली आहे. या‎ रस्त्यांना मंजूरी मिळताच आता‎ याचे श्रेय वादाचे राजकारणही रंगू‎ लागले आहे. आ. संदीप क्षीरसागर‎ यांनी आपणच हे रस्ते मंजूर करुन‎ घेतल्याचा दावा केला तर,‎ भाजपनेही खा. मुंडेंच्या माध्यमातून‎ रस्ते मंजूर झाल्याचा दावा केला‎ आहे.

पाठोपाठ बाळासाहेबांच्या‎ शिवसेनेनही हे शिंदे सरकारचे यश‎ असल्याचे म्हणत क्षीरसागरांनी श्रेय‎ लाटू नये अशी टिका केली आहे.‎ जिल्ह्यात मागील काही‎ काळापासून कोणतेही विकास काम‎ आले की हे विकास काम आपणच‎ आणल्याचा दावा सर्वपक्षीय‎ नेत्यांकडून केला जात आहे.‎ विशेषत: राज्यातील राजकीय‎ स्थित्यंरानंतर यात वाढ झाली आहे.‎

शनिवारी बीड विधानसभा मतदार‎ संघातील चऱ्हाटा फाटा ते छत्रपती‎ शिवाजी महाराज पुतळा, शिरापूर‎ धुमाळ ते चऱ्हाटा फाटा, बार्शी‎ नाका ते पांगरबावडी आणि‎ पांगरबावडी ते जरुड फाटा या चार‎ रस्त्यांच्या कामासाठी २१३ कोटींचा‎ निधी मंजूर झाला. यानंतर लगेच‎ राष्ट्रवादीचे आमदार संदीप‎ क्षीरसागर यांनी आपण प्रयत्न‎ केल्याने हे रस्ते मंजूर झाल्याचा‎ दावा केला पाठोपाठ भाजप‎ जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी खा.‎ प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे व‎ त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी‎ यांची भेट घेत केलेल्या पाठ‎ पुराव्याने हा रस्ता मंजूर झाल्याचे‎ सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांची‎ शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन‎ मुळूक यांनीही क्षीरसागर यांनी श्रेय‎ लाटू नये अशी टिका केली.‎

बातम्या आणखी आहेत...