आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जीवदान:सर्पमित्रांनी कृत्रिम पद्धतीने अंडे उबवून दिले कोब्रा जातीच्या 22 पिल्लांना जीवनदान, साप शोधताना आढळली होती अंडी

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनेगाव ( ता. केज ) येथे घरात दिसलेल्या सापाचा शोध घेताना सर्पमित्रांना कोब्रा जातीच्या सापाचे अंडे आढळून आले. तर साप निघून गेल्याने ही अंडे आणून त्यांनी कृत्रिम पद्धतीने उबविली. त्यातून जन्माला आलेल्या 22 पिल्लांना नैसर्गिक वातावरणात सोडून देण्यात आल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. 

साप अथवा नाग आहे असा शब्द ऐकून अनेकांच्या अंगावर शहारे येतात. तर प्रत्यक्षात साप आढळून आला, तर अंगाचा थरकाप आणि बोबडीच वळते. अशीच अवस्था धनेगाव ( ता. केज ) येथील एका घरात दिसलेल्या सापाला पाहून कुटुंबांची झाली होती. त्यांनी युसूफवडगाव येथील आकाश वैरागे आणि अक्षय वैरागे या दोन सर्पमित्रांनी फोन करून बोलावून घेतले. सर्पमित्रांनी घरात शोध घेतला. तोपर्यंत घरातून साप निघून गेला होता. शेवटी त्यांनी या  घराच्या आजूबाजूला शोध घेत असताना त्यांना एक बीळ दिसून आले. या बिळात साप गेला असावा, म्हणून त्यांनी बिळातून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु बिळातून साप बाहेर येत नसल्याने बीळ खोदून काढत असताना त्यांना बिळात क्रोबा जातीच्या नागाची तब्बल 22 अंडे आढळुन आली. त्यांनी ते अंडे सुरक्षित आणि अलगदपणे बाहेर काढुन घरी आणली. घरी कृत्रिम पद्धतीने अंड्यांना ऊब दिल्याने तीन - चार दिवसाने त्यातून क्रोबा जातीच्या नागाच्या 22 पिल्लांनी जन्म घेतला. तर सर्पमित्रांनी घेतलेल्या काळजीमुळे या अंड्यांना कुठल्याही प्रकारची इजा न झाल्याने 22 पिल्लांचा जन्म झाला. त्यांनंतर या पिल्लांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आल्याने कोब्रा जातीच्या नागाच्या पिल्लांना जीवदान मिळाले.