आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:लिंबागणेशमध्ये 24 तास छबिना मिरवणूक; पालखीपुढे पायघड्या

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबागणेश येथील १६ व्या शतकातील भालचंद्र गणपतीच्या मंदिरातील शेंदूरचर्चित लहान उत्सव मूर्तीची गुरुवारी ऋषिपंचमीच्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता आरती करण्यात आली. यानंतर मूर्ती पालखीत ठेवून टाळ-मृदंगांच्या गजरात मंदिरातून छबिना मिरवणूक निघाली. मिरवणुकीसमोर डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली, तर लेझीम पथकाने रंगत आणली.गवळणी, भक्तिगीतांनी आणली रंगत : गणपतीच्या पालखीसमोर भजनी मंडळींसह गणेशभक्तांनी गवळणी, भावगीते गायली. मिरवणूक घरासमोर येणार असल्याने दारोदारी रांगोळ्या, कमानी, लायटिंग फुलांची सजावट केली होती. नाेकरी व व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेली चाकरमान्यांनी मिरवणुकीत येऊन सहभाग घेतला.

संपूर्ण गावकरी सहभागी, २४ तास मूर्तीची मिरवणूक
गुरुवारी रात्री सुरू झालेल्या छबिना मिरवणुकीत गावकरी सहभागी झाले होते. रात्री ११ वाजता गावातील मारुती मंदिरासमोर ४ तास पालखी दर्शनासाठी होती. त्यानंतर रात्री दीड वाजता गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघाली. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ही मिरवणूक भालचंद्र मंदिरात पोहोचल्यानंतर देवाला विश्रांती देऊन सामुदायिक महाआरती केली. यानंतर महाप्रसादाचे वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...