आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:10 शेतकऱ्यांचा 25 एकर ऊस जळाला, मेहकरीतील नवा मळा परिसरातील घटनेत लाखोंचे नुकसान

आष्टी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकरी येथील नवा मळा परिसरातील दहा शेतकऱ्यांचा २५ एकर ऊस जळून ५० लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. विजेच्या तारांमधून घर्षण झाल्याने ठिणग्या पडल्यामुळे ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मेहकरी परिसरात मोठ्या प्रमाणात उस लागवड झालेली आहे. आष्टी तालुक्यात साखर कारखाना नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फरपट होत आहे. मार्च महिना संपला तरी ऊस गाळपासाठी गेलेला नाही. मेहकरी येथील नवामळा परिसरातील रघुनाथ जगताप, पाटील जगताप, राजेंद्र जगताप, नंदू जगताप, महादेव जगताप, बापूराव जगताप, कानिफ जगताप, भाऊसाहेब जगताप यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे शेजारी-शेजारी लगत उसाचे क्षेत्र आहे. गुरुवारी (३१ मार्च) सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारांत घर्षण झाले व ठिणग्या पडल्या. तब्बल २५ एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला. आष्टीतील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत आगीचे तांडव सुरू होते. आग विझविण्यासाठी ५ ते ६ तासांचा अवधी लागला. मात्र, तोपर्यंत उसाच्या फडाची राखरांगोळी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...