आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचे हाल:निवडणुकीसाठी अडीचशे बस, जिल्हाभरातील प्रवाशांचे हाल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यात सुमारे २५० बसेस बुक केल्या. शनिवारी या बसेस कर्मचारी आणि मतदान यंत्र घेऊन गेल्या. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने बस बुकिंग झाल्याने बीड बसस्थानकात प्रवाशांचे मात्र हाल झाले.

जिल्ह्यात आज रविवारी ७०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे शनिवारी मतदान केंद्रांवर मतपेट्या, पोलिस बंदोबस्त रवाना केला गेला. याच्या वाहतुकीसाठी व मतदानानंतर कर्मचाऱ्यांना परत घेऊन येण्यासाठी प्रशासनाने एसटीची व्यवस्था केली आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हाभरातील सुमारे २५० बसेस बुक केल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येेने बसेस निवडणूकीच्या कामासाठी असल्याने बसस्थानकात मात्र विविध मार्गांवर जाणाऱ्या बसेस ची संख्या कमी झाली होती. त्यामुळे बीड मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

बातम्या आणखी आहेत...