आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येडेश्वरी साखर कारखाना:येडेश्वरी कडून 2500 रुपये भाव; 400 रुपायांचा हप्ता वर्ग

केज8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने सन २०२१ - २२ च्या आठव्या गळीत हंगामात उसाला २५०० रुपये भाव देत चेअरमन बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे. कारखान्याने यापूर्वी २१०० रुपयांचा पहिला हप्ता दिला होता. १ ऑगष्ट रोजी उर्वरित चारशे रुपयांचा हप्ता ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने सन २०२१ - २२ च्या आठव्या गळीत हंगामात गाळप क्षमता वाढवून ८ लाख ४२ हजार ६१६ मे. टन विक्रमी गाळप करीत जिल्ह्यात अव्वल कारखाना म्हणून ओळख निर्माण केली होती. शिवाय इथेनॉल प्रकल्प सुरू करीत १ कोटी १७ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन काढले आहे. तर कारखान्याने ४ कोटी ४ लाख १० हजार युनिट वीजनिर्मिती केली होती. यंदाच्या हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने गाळपावाचून राहण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती.

अशा परिस्थितीत कारखान्याने पावसाळ्याच्या तोंडापर्यंत गाळप सुरू ठेवून कारखान्याच्या क्षेत्रातील ऊसाचे गाळप करून कारखाना बंद करण्यात आला होता. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सतत विचार करीत यंदाच्या हंगामात उसाला २५०० रुपये दिला आहे. यापूर्वी कारखान्याने शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात २१०० रुपये दिले होते. आता १ ऑगष्ट रोजी उर्वरित राहिलेले चारशे रुपये ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करीत कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देण्याचा दिलेला शब्द पाळला आहे.

शेतकऱ्यांचे हित लक्षात
येडेश्वरी कारखाना हा तालुक्यातील व व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून वाटचाल करीत आहे. गत हंगामात तालुक्यात अतिरिक्त ऊस असल्याने आपला ऊस शिल्लक राहतो की काय ? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप करून कारखाना बंद केला. कारखान्याने सर्वाधिक भाव दिला असून यापुढे ही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखाना यशस्वीरित्या चालवला जाईल, असे येडेश्वरी साखर कारखाना चेअरमन बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

कारखान्यांमध्ये होणारी स्पर्धा शेतकरी हिताची
उसाचे पीक घेऊन मोठे कष्ट करून उस कारखान्याला गेल्यानंतर अनेकदा समाधानकारक मोबदला मिळत नसतं. त्यामुळे उस उत्पादक शेतकरी नाराज होत. पश्चिम महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत उसाला अतिशय चांगला भाव मिळायचा. सुदैवाने येडेश्वरी साखर कारखान्याने २५०० रूपये असा सर्वाधिक भाव दिला. या दरामुळे इतर कारखान्यांनाही स्पर्धा निर्माण होऊन त्यांच्याकडूनही चांगला भाव मिळेल. येडेश्वरीच्या हा निर्णय चांगला आहे, असे शेतकरी समाधान काळेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...