आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई, परळी आणि धारूर या तीन तालुक्यांमध्ये डिसेंबर २०२२ या महिन्यात २ लाख ९८ हजार ९९३ लिटर मद्यविक्री झाली. तळीरामांनी विविध प्रकारचे लाखो लिटर मद्य रिचवून शासन तिजोरी भरली आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्ष मद्य विक्री बंद होती. परिणामी मद्य विक्रीतून शासन तिजोरीत कोट्यावधी रुपयाचा जमा होणारा महसूल बंद झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर मद्य विक्री पूर्ववत झालेली दिसून येत आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेचे चाक लॉकडाउनमध्ये रुतल्याने सरकारसमोर महसूलाचा प्रश्न निर्माण झाला होता.
आता, कोरोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली. अंबाजोगाई राज्य उत्पादन शुल्क कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंबाजोगाई, परळी आणि धारूर या तीन तालुक्यांमध्ये डिसेंबर २०२२ या महिनाभरात २ लाख ९८ हजार ९९३ लिटर मद्य विक्री झाली आहे. गेल्या वर्षी २०२१ डिसेंबर मध्ये ३ लाख ४ हजार १८० लिटर मद्याची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ५ हजार १८७ लिटर मद्याची विक्री कमी झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये देशी मद्याची विक्री १ लाख ३६ हजार एक्केचाळीस लिटर, विदेशी दारू १ लाख
विदेशी दारूची यंदा एक हजार लिटरने अधिक विक्री
अवैध विक्रीवर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने अंबाजोगाई विभागात अवैध दारु विक्री विरोधातही मोहिम चांगल्या प्रकारे राबवली. हातभट्टी अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात अधिक कारवाया झाल्या आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत ५ हजार १८७ लिटर मद्यविक्री घटली, बियरच्या विक्रीत झाली वाढ ८ हजार ७६४ लिटर, बिअरची विक्री ५२ हजार ७५५ लिटर आणि उच्चभ्रू लोकांची पसंती असलेली वा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.