आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकली:पालकत्व हरवलेल्या 30 विद्यार्थ्यांना मिळाल्या सायकली

शिरूरकासार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हील फॉर एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमांतर्गत तालुक्यातील निराधार, अनाथ व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या ३० विद्यार्थ्यांना शहरातील जि.प. शाळेत रविवारी सायकलींचे वाटप करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे येथील पत्रकार हेमंत जाधव हे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी महादेव जायभाये, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, निरंजन सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश कासट, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद धायगुडे, भीमाबाई कासट, पत्रकार संतोष फुटक, सुभाष सुर्वे, विधिसेवा सदस्य समीर पठाण, सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष रामनाथ कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांची उपस्थिती होती.

सायकल वाटपाचा हा पहिला टप्पा असून येत्या नवरात्र उत्सवात दुसऱ्या टप्प्यातील सायकलींचे वाटप करणार असल्याचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे त्यातील तेरा लाभार्थी या मुली आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे देखील जाधव म्हणाले. शिरूर तालुका मुलींच्या जन्मदरात रेड झोन मध्ये असताना विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या कामगिरीमुळे मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी मदत झाली होती. अशा ग्रामीण भागात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य असल्याचे देखील जाधव यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट बोलताना म्हणाले, ज्या शाळेत शिक्षण घेतले आहे त्या शाळेतील निराधार विद्यार्थ्यांना मदत द्यायला मिळतेय हे माझं भाग्य आहे. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक अंकुश शिंदे, कालिकादेवी विद्यालयाचे प्राचार्य अप्पासाहेब येवले, ज्येष्ठ शिक्षिका चंदा धाबे, दत्ता गाडेकर, वंदना गाडेकर यांच्यासह माऊली पानसंबळ,आदर्श शिक्षक शहादेव मुळे, नितीन कैतके, अमोल रणखांब, शैलेंद्र अंदुरे, प्रशांत गाडेकर, विजयकुमार गाडेकर, सतीश मुरकुटे, राज कातखडे, अंबादास गोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निरंजनचे समन्वयक जीवन कदम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गोकुळ पवार यांनी केले, तर आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी मानले.

मुलांनी व्यक्त केला आनंद
संस्थेच्या वतीने पहिल्या टप्प्यात एकूण ३० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यातील १३ मुली होत्या. तर, दुसऱ्या टप्प्या आणखी विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. सायकल मिळाल्याने मुलांनी आनंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...