आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर:बारावीत गणिताच्या पेपरला 314 विद्यार्थ्यांनी मारली‎ दांडी, जिल्हाधिकारी, एसपींच्या तीन परीक्षा केंद्रांना भेटी‎

बीड‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या परिक्षेत शुक्रवारी गणित व‎ संख्याशास्त्र भाग एक या विषयाच्या पेपरला‎ ३१४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. दरम्यान,‎ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक‎ नंदकुमार ठाकूर यांनी बीड तालुक्यातील तीन‎ परिक्षा केंद्रांना भेटी देऊन पहाणी केली.‎ गणिताच्या पेपरला एकही कॉपी केस झाली‎ नाही.‎ एकूण १५ हजार ५८३ पैकी १५ हजार २६९‎ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली तर, ३१४ विद्यार्थ्यांनी‎ दांडी मारली.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या‎ परीक्षेत कॉप्या होत असल्याची बाब‎ जिल्हाधिकाऱ्यांपर्यं त पोहचली होती.त्यामुळे‎ जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ आणि पोलिस‎ अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शुक्रवारी‎ चंपावती विद्यालय, बेलखंडी पाटोदा आणि‎ निरगुडी या तीन परीक्षा केंद्रांना भेट देऊन पहाणी‎ केली. या वेळी कॉपी करताना विद्यार्थी आढळून‎ आले नसले तरी केंद्र परिसरात मोठ्या‎ प्रमाणावर कागद आढळून आले त्यामुळे कॉपी‎ होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास‎ आले.‎

बातम्या आणखी आहेत...