आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 जुगाऱ्यांना गजाआड:बीड शहर व उजनी येथे‎ 32 जुगारींना पकडले‎

बीड/ अंबाजाेगाई‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरात सहायक पोलिस‎ अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वत:‎ पथकासाेबत माळीवेस भागातील सनी‎ आठवलेच्या जुगार अड्ड्यावर छापा‎ मारुन २४ जुगाऱ्यांना गजाआड केले‎ तर, अंबााजोगाई तालुक्यातील उजनी‎ येथे अपर पोलिस अधीक्षक कविता‎ नेरकर यांच्या पथकाने ८ जणांना‎ ताब्यात घेतले.‎ माळीवेस भागात सनी आठवले हा‎ जुगार अड्डा चालवत असल्याची‎ माहिती सहायक पोलिस अधीक्षक‎ पंकज कुमावत यांना मिळाली होती.‎ स्वत: पथकासह गुरुवारी रात्री‎ आठवलेच्या अड्ड्यावर छापा मारला‎ यावेळी २४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले‎ गेले या कारवाईत २१ लाख रुपयांचा‎ मुद्देमाल जप्त केला गेला आहे.

या‎ प्रकरणी बीड शहर पोलिसांत गुन्हा नोंद‎ करण्यात आला.‎ या कारवाईत कुमावत यांच्यासह‎ पीएसआय वैभव सारंग, राजेश‎ पाटील, कर्मचारी बाबासाहेब बांगर,‎ राजू वंजारे, बालाजी दराडे, सचिन‎ अहंकारे, रुख्मीणी पाचपिंडे, आशा‎ चौरे, विकास चोपणे, अनिल मंदे,‎ दिलीप गिते, रामहरी भंडाणे, संजय‎ टुले, दीपक जावळे, शफिक पाशा‎ यांनी केली. तर, अंबाजागेाईतील‎ उजनी येथे अपर पोलिस अधीक्षक‎ कविता नेरकर यांच्या पथकाने छापा‎ टाकून जुगार खेळणाऱ्या गणपत‎ गुट्टे,बापूसाहेब गायकवाड,राम मुंडे‎ ,राजकुमार जाधव, संजय राऊत,‎ माणिक मुरकुटे,माणिक मुंडे ,विनायक‎ फड या आठ जणांना ताब्यात घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...