आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाराती रुग्णालयात तपासणी‎:34 शिक्षकांच्या दिव्यांगत्व,‎ आजारपणाबाबत फेरतपासणी‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी‎ बदलीसाठी दिव्यांग, गंभीर आजारी‎ असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करुन‎ संवर्ग एकमधून सोयीस्कर बदलीसाठी‎ अर्ज केला होता. मात्र, याबाबत तक्रारी‎ आल्याने शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची‎ प्राथमिक तपासणी झाली होती आता,‎ शिक्षकांची फेरतपासणी हाती घेतली‎ असून आज मंगळवारी ३४‎ शिक्षकांच्या दिव्यंगत्व, आजारपणाची‎ अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात‎ तपासणी होणार आहे.

याबाबत‎ शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले आहे.‎ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची‎ प्रक्रिया दोन वर्षानंतर यंदा रावबली‎ जात आहे यासाठी विविध संवर्ग तयार‎ करुन बदलीपात्र शिक्षकांची माहिती‎ मागवली गेली होती. बदलीसाठीचा‎ संवर्ग एक हा दिव्यांग शिक्षक, गंभीर‎ आजारी शिक्षक किंवा शिक्षकांचे‎ गंभीर आजारी कुटुंबिय यांच्यासाठीचा‎ असून त्याबाबत विचार करुन‎ शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदली‎ दिली जाते. मात्र, या संवर्गाचा गैरवापर‎ करुन अनेक शिक्षकांनी बनावट‎ दिव्यांगत्व प्रमाणपत्र दाखल केले,‎ स्वत: किंवा इतर कुटुंबिय गंभीर‎ आजारी असल्याचे दाखवले. मात्र,‎ याबाबत तक्रार झाल्याने सुमारे ३३६‎ शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची व‎ आजारपणाची प्राथमिक तपासणी‎ केली गेली होती. यानंतर सुमारे‎ सव्वादोनशे शिक्षकांची फेरतपासणी‎ करण्याचे नियोजन केले गेले होते.‎

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ‎ वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयातील तज्ज्ञांकडून ही‎ तपासणी केली जाणार आहे. याबाबत‎ वेळापत्रक निश्चित केले आहे.‎ सोमवारी सुमारे ४० शिक्षकांची‎ तपासणी झाल्यानंतर आता मंगळवारी‎ ३४ जणांची तपासणी होणार आहे.‎ याबाबत प्राथमिक विभागाचे‎ शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी‎ यांनी आदेश काढले आहेत. या‎ तपासणीत दिव्यांगत्व व गंभीर आजार‎ नसल्याचे समोर आले तर शिक्षक‎ संवर्ग एकमधून बदलीपात्र ठरणार नाही‎ शिवाय, खोटी माहिती दिल्याने‎ त्यांच्यावर कारवाईचा बडगाही‎ उगारला जाण्याची शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...