आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध नैसर्गीक आपत्ती:सरकारच्या 3,500 कोटींमध्ये जिल्ह्याच्या नशिबी कवडी नाही ; राज्य सरकारवर नाराजी

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर, यासारख्या विविध नैसर्गीक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपयांची मदत घोषित करून जिल्हानिहाय वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर त्या शासन निर्णयामध्ये कोणत्याही निकषात बीड जिल्ह्यासाठी एक फुटकी कवडीसुद्धा मदत दिलेली नाही. माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

मागील २ महिन्यांत सोयाबीनसह विविध पिकांना उगवल्यानंतर गोगलगायींनी खाऊन टाकले, शेतकऱ्यांना ३-४ वेळा पेरण्या कराव्या लागल्या, त्यात एकरी हजारो रुपये वाया गेले. मागील ३ महिन्यात बीड जिल्ह्यात सुमारे १०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, मात्र राज्य सरकारला हजारो हेक्टर शेतामध्ये वाटोळे केलेल्या गोगलगायी दिसल्या नाहीत व त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या व्यथाही दिसल्या नाहीत, हे दुर्दैव असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही
जिल्ह्यातील सुमारे १२ ते १५ हजार हेक्टर शेतातील सोयाबीनचे गोगलगायींनी नुकसान केले होते. हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. समिती, अभ्यास या जंजाळातून बाहेर येत, नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीच्या निर्णयाचा फेरविचार करत गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...