आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्य:370 रुग्ण तपासणी; 65 जणांचे रक्तदान ; अंबाजोगाईत आराेग्य शिबिराला मिळाला प्रतिसाद

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवानेते अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी श्री.योगेश्वरी शाळा,प्रशांत नगर येथे आयोजित रक्तदान शिबीरात ६५ जणांनी रक्तदान केले.तर आरोग्य तपासणी शिबिरात ३७० रुग्णांच्या विविध तपासण्या व औषधोपचार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी योगेश्वरी शाळा येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे उदघाटन प्रसिद्ध श्वसन विकार तज्ञ डॉ.अनिल मस्के,डॉ.संदीप थोरात, माजी उपनगराध्यक्ष शेख रहिम, डॉ सुरेश अरसुडे,रोटरी क्लब च्या सचिव रोहणी पाठक, , भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष धनराज सोळंकी, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब टाक, महेंद्र निकाळजे, धोंडीराम चव्हाण, विनोद पोखरकर,उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिरात ३७० रुग्णांच्या थायरॉईड, मणकेविकार, अस्थीरोग व इतर आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. शिबिरासाठी डॉ.विष्णुदास खंदाडे,र डॉ.पिंगला आळणे, डॉ.संजय शेळके यांनी रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले. शिबिरासाठी अक्षय मुंदडा मित्रमंडळाचे संयोजक डॉ.निशिकांत पाचेगावकर, कल्याण काळे, अमोल साखरे, सचिन गौरशेटे, अनंत अरसुडे, अमोल पवार, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, बाला पाथरकर, बळीराम चोपणे, अमोल पवार, गोपाळ मस्के, महेश अंबाड, गौरव लामतुरे, दिग्विजय लोमटे, राहुल कापसे, माणिक पाटील, शिरीष मुकडे, संतोष जिरे,अहेमद पपूवाले ,योगेश कडबाने ,शेख सुजात ,इर्शाद शेख, दिपक सुरवसे,पद्यमनाभ देशपांडे,किरण भालेकर ,बाळा गायके यांनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...