आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळी होवुन पंधरा दिवस उलटले तरी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ गावातील अडीच हजार लाभार्थ्यांना राज्य सरकारचा आंनदाचा शिधा मिळू शकलेला नाही. या शिध्यातील साखरेसह, चनादाळ, रवा या वस्तु प्रत्येकी २६ क्विंटल ५० किलो आल्या असुन त्या सध्या धारूरच्या गोदामात वाटपाअभावीधुळखात पडल्या आहेत. एकुण २७८५ लिटर तेलाची मागणी असताना केवळ ३८० लिटर तेलाचा कंत्राटदाराकडून धारूरला पुरवठा झाला असुन आणखी २४०५ लिटरतेलाची गरज आहे. परंतु मागणी प्रमाणे तेलच आले नसल्याने हा सर्वच आंनदाचा शिधा वाटपाअभावी गाेदामाच पडून आहे.
धारूर तालुक्यातील एकूण ५५ गावात १२५ रेशन दुकानदार असुन कार्ड धारकांची संख्या २९ हजार आहे. या तालुक्यात दिवाळीपूर्वी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२२ रोजीशंभर रूपयात साखरेसह चनाडाळ, रवा आणि तेल या वस्तु प्रत्येकी एक एक किलो रेशन वरील अन्न सुरक्षा, अंत्योदय, शेतकरी, एपीएल अशा कार्डधारक लाभार्थ्यांनादेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आनंदाचा शिधा पाकिटे गोदामात पोहोचली होती ही पाकिटे येताच तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरांबा, रेपेवाडी,रुईधारूर, मैंदवाडी, देव दहीफळ, गांजपुर, प.पारगाव, कोळपिंपरी या आठ गावातील १० स्वस्त धान्य दुकानांतर्गत एकुण २६५० कार्डधारकापर्यंत गोदाम रक्षक तसेचतालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी पोहचवणे आवश्यक होती.
परंतु ही आठही गावे मागील पंधरा दिवसापासून आंनदाच्या शिध्यापासून वंचित राहिली आहेत. दिवाळीत या लाभार्थ्यांना बाजारातून या वस्तू महागड्या दराने खरेदीकराव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे आनंदाचा शिधा आज येईल, उद्या येईल या आशेवर असलेले काही उसतोड कामगार असलेले कार्डधारक उसतोडणीसाठीस्थलांतरीत झाले आहेत. दरम्यान ९ नोव्हेंबर २०२२ रोजी येथील गोदाम रक्षक गोडसे यांनी तहसील कार्यालयाला लेखी पत्र दिले असले तरी अद्याप उर्वरीत तेलआलेले नाही. आता जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गोदामरक्षकास वाटपासाठी सूचना देणार
आंनदाचा शिधा वाटप करणाऱ्या कंत्राटदाराकडे आम्ही २४०५ तेलाची मागणी केली आहे. यापैकी किती तेल आले आहे. हे मला माहिती नव्हते. गोदामात सध्या ज्यावस्तु उपलब्ध आहेत त्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी गोदामरक्षकाला सुचना देणार आहे.-जी.बी. तापडिया, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग
एकूण २७८५ लिटर तेलाची गरज असताना आले कमी
धारूरच्या गोदामाईला कंत्राटदाराकडून केवळ ३८० लिटर तेलाचा पुरवठा झाला असुन आणखी २४०५ व एकूण २७८५ लिटर तेलाची गरज आहे. परंतु मागणी प्रमाणे तेलचआले नसल्याने आंनदाच्या शिध्यातील साखर, रवा आणि चणाडाळ या वस्तु अद्याप वाटप करण्यात आलेल्या नाहीत.तेलाची ३८० पाकिटे सध्या धारूरच्या गोदामात
धुळखात पडून आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.