आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमेंट काँक्रीटची चिमणी उध्‍वस्‍त:परळीमध्‍ये  42 वर्षे जुनी चिमणी 3 मिनिटांत जेसीबीने जमीनदोस्त

परळी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १, २ व ३ हे संच भंगारात काढण्यात आले हाेते. १,२ क्रमांकाचे संच वर्षभरापूर्वी पाडले तर तिसऱ्या संचाची सिमेंट काँक्रीटची चिमणी जेसीबीद्वारे साेमवारी (१२ सप्टेंबर) जमीनदाेस्त करण्यात आली.

१२० फुटांची चिमणी फक्त तीन मिनिटांत पाडली गेली. १९७१ मध्ये एका संचाद्वारे सुरू झालेल्या परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात एकूण असे आठ संच होते. सोमवारी तिसरा संच जमीनदोस्त करण्यात आला. वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळल्यानंतर निघणारा धूर चिमणीद्वारे हवेत सोडतात. संकलन : धनंजय आढाव.

बातम्या आणखी आहेत...