आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:वाळूच्या लिलावाला 45 ग्रा.पं.चा विराेध ; मागील वर्षी वाळूतून 15 कोटींची उलाढाल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मागील वर्षी २०२०-२१ मध्ये ९२ वाळू घाटांसाठी प्रस्ताव आले हाेते. परंतु, ३२ ग्रामपंचायतींनी ठरावांद्वारे लिलावासाठी नकार दर्शविला हाेता. तरीही चार तालुक्यांमधील २२ वाळू घाटांमधून मागील वर्षी सव्वादोन लाख ब्रास वाळूतून १५ कोटींची उलाढाल झाली. या वर्षीदेखील वाळूघाटांसंदर्भात ४५ ग्रामपंचायतींच्या सभेतून ठराव नकारार्थी आलेत. परंतु, या ग्रामपंचायतींच्या मनपरिवर्तनासाठी जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून यंदा दिवाळीआधी वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामधील वाळू घाटांचे सर्वेक्षण सुरू आहे. दरम्यान, माजलगाव, गेवराई आणि परळी या तालुक्यांतील ४५ ग्रामपंचायतींनी सभा घेतली असता ठराव नकारार्थी आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...