आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंठण लंपास:बसमधून महिलेचे 49 हजारांचे गंठण लंपास

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मांजरसुंबा येथून केजकडे बसमधून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४९ हजार रुपयांचे गंठण लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

धारूर शहरातील कडघर भागातील माया बालविरसिंग दिख्खत ही वृद्ध महिला आपल्या पतीसह सोलापूरला लग्न समारंभास गेले होते. १७ डिसेंबर रोजी सकाळी सोलापूरहुन मांजरसुंबा येथे आले. दुपारी १ वाजेच्या सुमारास गंगापूर - अंबाजोगाई या बसने मांजरसुंबा येथून केजला आले.

या प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून माया दिख्खत यांच्या गळ्यातील ४९ हजार रुपये किंमतीचे व ७ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरून घेतले. हा प्रकार ते केजला बसस्थानकात उतरल्यावर उघडकीस आला. माया दिख्खत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...