आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई:50 खोके, महागाई एकदम ओके

माजलगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील वाढत्या महागाईच्या प्रश्नावर केंद्र शासनाच्या विरोधात गुरुवारी माजलगावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने “५० खोके महागाई एकदम ओके’ असे म्हणत आंदोलन करण्यात आले. केंद्रात व राज्यातल्या सरकारमुळे महागाईवर कुठलेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. वाढलेल्या महागाईकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी सकाळी १० वाजता रायुकाँच्यावतीने ‘५० खोके, महागाई एकदम ओके’ आंदोलन करण्यात आले.

या वेळी रायुकाँचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, राहुल लंगडे, प्रमोद तौर, सचिन झगडे, राजू कुरेशी, क्षितिज गायकवाड, शुभम भोसले, चंद्रकांत पवार, गोविंद धुमाळ, अंगद तांबे, दिनेश मेंडके, विजय पवार, सुलतान मन्सुरी, आदित्य गायकवाड, ज्ञानेश्वर विघ्ने, दत्ता ठेरे, चाभारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

बातम्या आणखी आहेत...