आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालय प्रशासनाची माहिती:विषबाधा झालेल्या 50 महिलांची प्रकृती सुधारली, काहींना दिली सुटी

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानिमित्त सुवासिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या जेवणातून जवळपास ५० महिलांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथे मंगळवारी घडली होती. दरम्यान, सर्व महिलांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती स्वाराती रुग्णालय प्रशासनाने दिली.

अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील तरुणाचा येत्या शुक्रवारी विवाह आहे. यानिमित्ताने सोमवारी (दि. ५) भावकीतील महिलांसाठी सुवासिनींचे जेवण आयोजित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी गावातील जवळपास शंभर महिलांनी या कार्यक्रमात जेवण केले. यामध्ये, संध्या शिंदे (३५), नीता शिंदे (४१), अनिता शिंदे (४५), श्रद्धा शिंदे (३०), सुवर्णा शिंदे (४०), झुंबर शिंदे (४०), संगीता शिंदे (४०), शीतल शिंदे (४०), सुनिता शिंदे (३०), मीनाक्षी शिंदे (४५), वर्षा शिंदे (४५), रोहिणी शिंदे (३०), मनीषा धुमाळ (२९), कविता शिंदे (४०), अनिता शिंदे (४५), जान्हवी शिंदे (१२), प्रभावती शिंदे (५२), सुरेखा शिंदे (४०), ज्ञानेश्वरी शिंदे (३१), माया शिंदे (४०), देवकन्या शिंदे (४२), मीना शिंदे (५०), शेषाबाई शिंदे (५५), कान्हाबाई शिंदे (६५), मंदोदरी शिंदे (६०), सुमन शिंदे (५०), अर्चना शिंदे (४०), सक्षमबाई शिंदे (६०), संगीता शिंदे (४५) अलका शिंदे (३५), रतनबाई शिंदे (६०), स्वाती शिंदे (२२) आणि काव्या शिंदे (४०) या महिलांंचा समावेश होता तर काही महिला खासगी रुग्णालयात दाखल होत्या. बुधवारी यातील अनेक महिलांना सुटी दिली गेली.

बातम्या आणखी आहेत...