आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमधील उपसरपंच पदासाठी चार टप्प्यात निवड करण्यात आली. ग्रामीण मतदारांचा कौल माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बाजूने असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात दिसून आले आहे. ७५ पैकी ५२ ग्राम पंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपसरपंच विराजमान झाले आहेत. बुधवारी झालेल्या २५ पैकी १९ ग्राम पंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपसरपंच निवडूण आले, यामध्ये अर्धपिंपरीत छगाबाई गोरे, आहेर वाहेगावात वाहेदखाँ पठाण, किनगावला ज्ञानेश्वर चाळक, कोल्हेरमध्ये पुष्पा येवले, गुंतेगावात राजकन्या गोर्डे, ताकडगावात सय्यद जावेद, बोरगावला राहुल जाधव, राजपिंपरीला प्रभाकर ढोकळे, एरंडगावला दत्तप्रसाद जाधव, कोळगावला कोमल धोत्रे, खळेगावला सचिन आहेर, खामगावात गौतम पारे, चोरपूरीत शशिकला शेळके, धोंडराईत बद्री जाधव, पोखरीत सरुबाई मोघे, लुखामसला येथे गंगूबाई व्हरकटे, वडगावला बाळासाहेब वारूळे आणि सुशीत कविता मोंढे या १९ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपसरपंचांची निवड करण्यात आली.
उपसरपंच निवडीचा दुसरा टप्पा दि.२९ रोजी पार पडला यात शिवाजी कादे (अर्धमसला), गंगुबाई कोठेकर ( ईटकुर), ज्योती पैठणे (टाकळगव्हाण), विलास गव्हाणे (टाकळगाव), अशोक मैंड (पौळाची वाडी), रमेश पवार (पांचाळेश्वर), कविराज गंगाधर (मालेगाव बु.), कैलास पवार (मारफळा), मारोती बलिया (मिरगांव), राणी हराळे (सैदापुर), विनायक चव्हाण (खांडवी), सुमित्राबाई आगरकर (जळगाव), बबन गर्जे (राजापूर), राधाबाई पवार (सिरसदेवी), दत्ता ठोसर (सिंदखेड), तीर्थराज कदम (सुरळेगाव), अमजद पठाण (हिरापुर) यांची निवड करण्यात आली. तिसरा टप्पा ३० डिसेंबर रोजी पार पडला. यात परमेश्वर धायगुडे (आम्ला), अशोक सोलाट (गौंडगांव), लताबाई पंडित (दैठण), किसनाबाई सूर्यवंशी (धुमेगाव), आण्णासाहेब मस्के (पाथरवाला बु.), हयातबी शेख (आंतरवाली), विश्वांभर आडाळे (रानमळा), शोभा मिसाळ (सावरगांव), रमेश डोंगरे (काजळा), विलास वैराळ (मनुबाई जवळा), गीता यादव (माटेगांव), गीता भाले (मालेगांव बु.), कविता उधे (सावळेश्वर) यांची निवड करण्यात आली. चौथा टप्पा ३१ डिसेंबर रोजी पार पडला. यात आशाबाई शिंदे(धानोरा), जालिंदर घवाडे (नांदलगांव), बाबासाहेब राठोड (निपाणी जवळका) यांची निवड करण्यात आली.
पुढील टप्प्यातील ग्रा.पं.साठी नियोजन चार टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ७५ पैकी एकूण ५२ ग्राम पंचायत मध्ये उपसरपंच विराजमान झाले. दरम्यान निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करुन आनंद साजरा केला. अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात पुढील उर्वरित ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.