आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज तालुक्यात पाऊसकाळ चांगला झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीची महत्वाच्या पिकांचे क्षेत्र दुप्पटीने वाढले आहे. तर हरभरा पिकाची सर्वाधिक ५४ हजार ५११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून रब्बी हंगामात पिके आणि भाजीपाला अशी ७५ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. त्यात आणखी भर पडणार असून तालुक्यात रब्बीच्या पेरण्या समाधानकारक झाल्या आहेत.
यंदा केज तालुक्यात गतवर्षीनुसार शेतकऱ्यांनी ६५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले होते. शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ धरल्याने त्याचा फटका सोयाबीन पिकाला बसला होता. त्यानंतर शंखी गोगलगाय, रोग किडींचा प्रादुर्भाव आणि सोयाबीन काढणीच्या तोंडावर झालेला परतीचा पाऊस यामुळे सोयाबीन पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली. मात्र सोयाबीन पिकाचा पीकविमा, अनुदान आणखी ही पदरात न पडल्याने खरिपाच्या हंगामात शेतकरी वर्ग तोट्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आता रब्बीच्या पिकांवर आहे.
यंदा रब्बी हंगामाच्या पेरण्या या सोयाबीन पिकांची काढणी करण्यास पावसामुळे पीक झालेला विलंब व मशागतीच्या कामामुळे उशिरा झाल्या आहेत. परतीच्या पावसाने तालुक्यातील लहान मोठे तलाव आणि मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले. शिवाय विहिरी आणि बोअरला मुबलक पाणी झाले. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र दुप्पटीने वाढले आहे. यंदा ही शेतकऱ्यांचा कल हरभरा पीक घेण्याकडे राहिला असून तालुक्यात हरभरा पिकाची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत हरभरा पिकांचे क्षेत्र दुप्पटीने वाढले अाहे.
फवारणीची कामे सुरू
केज तालुक्यात सुरुवातीला पेरणी करण्यात आलेली ज्वारी आणि हरभरा पिकांची वाढ चांगली झाली आहे. ज्वारी पिकात वाढलेले तण काढण्यासाठी अंतर मशागतीची कामे सुरु झाली असून हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.