आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन लाख १६ हजार रूपयांच्या खर्चात गेवराई तालुक्यातील खांडवी येथील शेतकरी दत्तात्रय केशव टेकाळे यांनी शेतातील बोअरचे पाणी विहिरीत सोडून ठिबक सिंचनावर कलिंगडाच्या शेतीतून पाच लाख ५० हजार रूपयांचे उत्पन्न घेतले आहे. शनिवारपासून कलिंगडाची काढणी सुरू झाली असून माजलगाव येथील व्यापाऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे.
आता गेवराईची कलिंगडे थेट राजधानी दिल्लीत पोहचणार आहेत. तालुक्यातील खांडवी येथील शेतकरी दत्तात्रय टेकाळे हे शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करतात. तीन भावंडात साडे चौदा एकर जमीन असुन शेतात ऊस, कापूस, मोसंबी, गव्हासह इतर पीक आहे. टेकाळे यांनी पावणे तीन एकर शेतात ९ जानेवारी २०२३ रोजी बीड येथून नर्गिस गोल्ड जातीचे कलिंगडाची २२ हजार रोपे आणून पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली. शुक्रवारी त्यांच्या शेतातील कलिंगडाची पाहणी माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांनी करत काैतुक केले.
शनिवारपासुन शेतातील कलिंगड काढणीचे काम सुरू झाले असुन एकुण ७० टन कलिंगड निघणार आहेत. माजलगाव येथील व्यापाऱ्यांनी टेकाळे यांच्या शेतातील कलींगडाची खरेदी केले असुन हे कलिंगड आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पोहचणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत ९ रूपये किलो प्रमाणे कलिगडे विक्री हाेत आहे.
बोअरचे पाणी विहिरीत सोडून ठिबक सिंचन कलिंगड लागवडीसाठी शेतकरी टेकाळे यांनी नांगरणी, मल्चिंग, खत, फवारणी केली. कामगारसह त्यांना एकुण २ लाख १६ हजार रुपये खर्च आला. उत्पन्न ५ लाख ५० हजार रुपयांचे झाले आहे. त्यांच्या शेतात चार बोअर असून बोअरचे पाणी विहिरीत सोडून ठिबक सिंचनावर त्यांनी कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास फायदा
माझ्या शेतातील कलिंगड हे दाेन किलोपासून ११ किलो वजनाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास कमी वेळात कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. - दत्तात्रय टेकाळे, शेतकरी, खांडवी ता.गेवराई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.