आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पाटोदा शहरातील 566 विद्यार्थ्यांनी‎ दिली मंथन सामान्यज्ञान परीक्षा‎

पाटोदा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचे योग्य स्पर्धेचे युग असून या‎ कालावधीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना‎ सामोरे जाण्याचे धाडस निर्माण व्हावे व त्यांच्या‎ बुद्धिमत्ता व गुणवत्तेचा विकास व्हावा यासाठी‎ मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे मंथन सामान्य‎ ज्ञान परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा पाटोदा‎ येथे या परीक्षेला विद्यार्थ्यांकडून अत्यंत‎ सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला.

पहिली ते‎ आठवी या गटात तब्बल ५६६ विद्यार्थ्यांनी ही‎ परीक्षा दिली.‎ मंथन वेल्फेअर फाउंडेशन अहमदनगर‎ यांच्या वतीने संपूर्ण राज्यात प्रत्येक वर्षी मंथन‎ सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित केली‎ जाते. पाटोदा शहरात देखील गतवर्षीपासून या‎ स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते.‎ विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांना‎ आत्मविश्वासाने व धाडसाने सामोरे जावे‎ याकरिता अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा सराव‎ व्हावा यासाठी या स्पर्धा परीक्षेचे आयोजन‎ केले जाते. यंदा पाटोदा तालुक्यातील‎ जवळपास ३५ च्या वर शाळांमधील पहिली ते‎ आठवी या वर्गातील तब्बल ५०६ विद्यार्थ्यांनी या‎ मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सहभाग‎ घेतला.

यास स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक‎ शाळांमध्ये जून महिन्यात नोंदणी केली जाते.‎ गतवर्षी २६४ विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा परीक्षा दिली‎ होती. या स्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना‎ राज्यस्तरावर पारितोषिक देऊन गौरविण्यात येते‎ तसेच स्थानिक स्तरावर देखील गुणवत्तेच्या‎ आधारे प्रत्येक वर्गातून तीन याप्रमाणे‎ विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाते. ‌‎ प्रत्येक शाळांमधून या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची‎ तयारी करून घेतली जाते.

यंदाच्या मंथन‎ सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता‎ पहिलीच्या वर्गातून ७१, दुसरी १०३, तिसरी ९६,‎ चौथी १३१, पाचवी ७०, सहावी ४७, सातवी ३८‎ तर आठवी १० अशाप्रकारे पहिली ते आठवी‎ दरम्यानच्या तब्बल ५०६ विद्यार्थ्यांनी मंथन‎ सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवत‎ ही परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये गणित मराठी‎ इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी अशा प्रकारच्या‎ विषयांमध्ये प्रश्न विचारण्यात येतात व मराठी,‎ इंग्रजी, हिंदी या तिन्ही माध्यमातून विद्यार्थी‎ सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...